सोलापूर : अट्टल गुन्हेगार आणि नगरसेवक लक्ष्मण जाधव यांचा मुलगा विकी याला ठाणे जिल्ह्यातील दिघा येथून विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. १६ मार्च रोजी विकी जाधव आणि संदीप गायकवाड यांच्याविरुद्ध मोटरसायकलवरून धडक देऊन नंतर शिवीगाळ व दमदाटी केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती . गुन्हा घडला त्या वेळी विकी जाधव हा तडीपार होता. त्याच्याविरुद्ध शहर आयुक्तालयामध्ये खंडणी मागणे, लूटमार करणे, शासकीय कामात अडथळा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, सहाय्यक फौजदार संजय मोरे ,यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.