बंगळुरू (कर्नाटक) – ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचे निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. जयंती यांची हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये एक लोकप्रिय चेहरा म्हणून ओळख होती.
एम.जी. रामचंद्रन आणि कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांच्याबरोबर सर्वात जास्त चित्रपट करणाऱ्या दक्षिण भारतातील अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. त्यांनी जवळपास 500 चित्रपटांमध्ये काम केले होते.कस्तुरी निवासा, मिस लिलावती, श्री कृष्णदेवराया आणि इडकल्लू गुड्डडा मेले हे त्यांचे काही प्रमुख चित्रपट आहेत. कन्नड चित्रपट जिना गुड्डु (1963) या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.