सोलापूर : वारकरी परंपरेमध्ये नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने साजरा केला जातो. या महिन्यात वारकरी मंडळी काकडा आरती करतात. वारकरी भाविकांनी चैत्रवारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती,आषाढीवारी, श्रावण मास, अधिकमास,गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव घरात बसून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला सहकार्यच केले. परंतु सध्या बाजार पेठे सहित सर्व दुकाने खुली केली आहेत,कोणतेच क्षेत्र खुले करण्याचे राहिले नाही. रुग्ण संख्या ही कमी होत आहे. म्हणून सुप्रसिद्ध मंदिर व इतर मंदिर असे दोन भाग करून नियमावली तयार करावी. नित्यनेम करणेसाठी महाराष्ट्रातील सर्व इतर मंदिर खुली करून सुप्रसिद्ध मंदिर टप्प्याटप्प्याने खुले करून कीर्तन, भजन व काकडा आरती करणेसाठी नियम व अटी घालून परवानगी लवकरात लवकर जाहीर करावी यासाठी सोलापुरातील जिल्हा परिषद गेट समोर भजन आंदोलन करण्यात आले. निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी अजित देशमुख यांना दिले.
यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, जिल्हा अध्यक्ष जोतिराम चांगभले, जिल्हा सचिव मोहन शेळके, शहर अध्यक्ष संजय पवार, शहर संघटक कुमार गायकवाड, कृष्णदेव बेलेराव, आदर्श इंगळे, अविनाश पवार, ह.भ.प.बजरंग नाना डांगे महाराज ,ह.भ.प.संजय केसरे महाराज,ह.भ.प.कृष्णदेव बेलेराव महाराज , ह.भ.प.सचिन भोसले,ह,भ.प.आदर्श ईंगळे महाराज ,ह.भ.प.कृष्णा चवरे महाराज आदी उपस्थित होते.
….अन्यथा आझाद मैदान येथे आंदोलन केले जाईल – सुधाकर महाराज इंगळे
महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा खुल्या आहे दुकान खुली आहेत. दारूचे दुकान मोठ्या प्रमाणामध्ये सुरु आहेत. सुरू करायचं काही शिल्लक राहिलेला नाही. नेते मंडळीने दसरा मेळावे साजरे केले. आम्हाला काकड आरतीला का बंद करण्यात येत आहेत असा प्रश्न आमच्यासमोर भाविकांनी समोर निर्माण होतो. आता आम्ही सोलापूर येथे आंदोलन केले आहे. आता तर परवानगी मिळाली नाही तर आम्ही मुंबई येथील आझाद मैदानावर पुढचे आंदोलन करणार आहोत.