जुळे सोलापूर येथील मंगल विहार सोसायटीमध्ये गणेशोत्सव 2025 दरम्यान दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त मा एम राजकुमार साहेब, प्रिसिजन ग्रुपचे सर्वेसर्वा यतीन शहा सर, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा मॅडम, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, टीव्ही 9 चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी सागर सुरवसे, मंगल सोसायटीच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश्वर संधीकर, उपाध्यक्ष मयूर कोरगावकर, कोषाध्यक्ष सुशील मोहोळकर, सागर बागल, स्वप्निल कुलकर्णी सहकोषाध्यक्ष चंद्रकांत इंगळे मान्यवर उपस्थित होते.


होम मिनिस्टर स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सौ वनिता सतीश बोंद्रे यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणीच्या मानकरी ठरल्या… तर सरोजा कपिल पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले… तिसरे बक्षीस ज्योती अविनाश गोरे यांना मिळाले… तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या उत्कृष्ट वेशभूषेसाठी ज्योती अविनाश गोरे यांनी प्रथम क्रमांक तर वर्षा सागर बागल यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीतील रहिवासी जयतीर्थ पडगाणूर यांनी तर या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दीप्ती इंगळे-सिद्धम आणि तृप्ती रत्नपारखे यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला… बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाफळकर मॅडम यांनी केले तर सुशांत देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास सोसायटीतील सर्व रहिवाशी, सभासद सहभागी झाले होते.