येस न्युज मराठी नेटवर्क : १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या डॉक्टरांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्धता, योग्य वाहतूक, साठवणूक व प्रत्यक्ष लस देणे यासंदर्भात माहिती घेतली.