येस न्युज मराठी नेटवर्क : मी सिनेसृष्टीत कारकीर्द सुरु केली तेव्हा मी साध्यासुध्या मराठी घरातून आलेली मुलगी आहे. मी ‘पिपलमेड’ स्टार आहे त्याचप्रमाणे मी ‘पिपलमेड लीडर’ व्हायला आवडेल असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. करोनाच्या कठीण काळात महाविकास आघाडीने खूप चांगलं काम केलं आहे. शिवसेना प्रवेशासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेसाठी माझं नाव दिल्याचं मला कळतं आहे. कंगनाने काही टीका केली तर तुम्ही उत्तर देणार का? त्यावर मी त्याबाबत काहीही प्रतिक्रिया देणार नाही असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. आजच उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांनी मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे असं म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा दर्जा वाढावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे असं शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं. शिवसेनेच्या भक्कम अशा महिला आघाडीचा मी एक भाग झाले याचा मला सार्थ अभिमान आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. वर्षभरात या महाविकास आघाडीने खूप चांगलं काम केलं आहे. करोनाचं संकट असो, वादळ असो किंवा इतर आपत्ती असो मी या सरकारला कायमच चांगलं काम करताना पाहिलं आहे. कुठल्याही विशिष्ट धर्माच्या लोकांना या सरकारने विशेष वागणूक दिली नाही. सगळ्यांना समान वागणूक दिली ही बाब मला खूप महत्त्वाची वाटते असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
सवंग आरोप करुन मला प्रसिद्धी मिळवायची नाही. कारण तो अत्यंत सोपा मार्ग असतो. काँग्रेसमध्ये होते तेव्हा मी पदाची अपेक्षा केली नव्हती. आज शिवसेनेत आले तरीही पदाची अपेक्षा नाही. मला लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून मी शिवसेनेत आले आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
देशाच्या राजकारणात सध्या विषारी वातावरण आहे असंही भाष्य उर्मिला मातोंडकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. तसंच बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचा अत्यंत किळसवाणा प्रयत्न मधल्या काळात झाला असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. मी तेव्हाही कुणाच्या विरोधात बोलले नाही, आताही बोलत नाही. मी महाराष्ट्राच्या बाजूने बोलते आहे असंही उर्मिला यांनी स्पष्ट केलं.