सांगली ( सुधीर गोखले) – आज सां, मि आणि कु महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला आज नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विकासकामांच्या फाईल महासभेत दाखवत यावर अधिकाऱ्यांच्या सह्या कधी होणार असा सवाल उपस्थित केला तर माजी महापौर नगरसेवक विवेक कांबळे यांनी या फाईल्स नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हातातून हिसकावून घेऊन त्या अक्षरशः फाडून टाकल्या यामुळे आज सभागृहात अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झाला. आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा ची महासभा पार पडली नगरसेवक योगेंद्र थोरात सुरवातीलाच चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. महापौरांसह पदाधिकाऱ्यांची कामे मंजूर झालेली आहेत मग आमच्या सारख्या नगरसेवकांचे काय? असा प्रश्नच त्यांनी केला. अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या लाखो रुपयांच्या कामांना अद्याप मंजुरी मिळाली नाही आम्ही सादर केलेल्या विकासकामांच्या फाईल वर सही करण्यास अधिकारी वर्ग विलंब करतात. नगरसेवकांना अशा फाईल वर सही साठी हेलपाटे मारावे लागत असतील तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल.
आज नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विविध विकासकामांच्या अशा पाच फाईल्स आज सभागृहात सादर केल्या यावेळी माजी महापौर आणि नगरसेवक विवेक कांबळे यांनी नगरसेवक थोरात हे या फाईल घेऊन सभागृहात आले हि हि त्यांची कृती बेकायदा असल्याचे सांगताच दोघांमध्ये वादंग निर्माण झाला त्यात या फाईल्स सभागृहातच फाडून टाकू असा इशाराच इथे दिला त्यावर नगरसेवक थोरात यांनी ‘आता इथेच या फाईली फाडून टाका’ असे म्हणत चक्क या फाईली विवेक कांबळे यांच्याकडे फेकल्या यावर माजी महापौर आणि नगरसेवक विवेक कांबळे यांनी यातील दोन फाईली फाडल्या आणि परत सभागृहात गोंधळ सुरु झाला. महापालिकेच्या सभागृहात विकासकामांच्या फाईल्स फाडल्याबद्दल नगरसेवक विवेक कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक थोरात यांनी केली आहे.
‘आपण जनतेसाठी आहात त्याच्यासाठी महापालिकेमध्ये येता याचे भान ठेवा’ आयुक्त पवार
आजच्या या झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आयुक्त सुनील पवार चांगलेच संतापले तर आपण जनतेसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी या सभागृहात येता याचे भान ठेवा समाजमाध्यमांवर आपल्या प्रसिद्धी साठी छायाचित्रे जावीत यासाठी काही नगरसेवक नेहमी धडपडत असतात पण त्यांनी जनतेसाठी आपण या सभागृहात येतो याचे भान ठेवावे अशा तीव्र शब्दांमध्ये आजच्या प्रकारावरून कान टोचले. जरी या सभागृहाची मुदत १९ ऑगस्ट रोजी संपत असली तरी आपल्या विकासकामांची यादी द्यावी मुदत संपल्यानंतरही त्यांच्या कामांसाठी प्राधान्य आपण नक्की देऊ. असेही आयुक्तांनी यावेळी सभागृहात सर्व नगरसेवकांना आश्वासित केले.