दुसऱ्या दिवशी सोलापूरच्या यश बोरामणीचे तडफदार शतक तर अभिषेक निषद चे ९ बळी
ए संघाला विजयासाठी हव्यात १५१ धावा आणि सी संघाकडे अद्यापि १५४ धावांची आघाडी
पुरुषांच्या वरिष्ठ गटाच्या डी.बी.देवधर चषक पाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे वतीने सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सौजन्याने येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आणि दयानंद कॉलेज मैदानावर राज्यातील २३ वर्षाखालील मुलांसाठीच्या संघ निवडीसाठी ३ दिवसीय क्रिकेट सामने पार पडत असून पहिल्या फेरीच्या दुसऱ्या दिवशी सोलापूरच्या यश बोरामणीचे तडफदार शतक पहायला मिळाले, कालच्या नाबाद ८१ वरून संयमी खेळी करत यश ने शतक लगावले आणि त्याच्याच जोरावर MCA ए संघाने पहिल्या डावात १०९ धावांची आघाडी मिळवली आणि दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अभिषेक निषद चे दुसऱ्या डावात ४ आणि एकुणात ९ बळी मुळे B संघाचा दुसरा डाव २५९ धावांवर संपला. सलामीची जोडी सागर पवार आणि हर्ष मोगावीरा यांनी शतकी (११७ धावांची) भागीदारी रचली तरी बाकीचे फलंदाज तग न धरू शकल्याने तिसऱ्या दिवशी आता ए संघाला विजयासाठी १५१ धावा करायच्या आहेत.
तर दुसरीकडे कालच्या २ बाद ८६ वरून पुढे खेळताना सी संघाने त्यांचा पहिला डाव ४१० धावांवर घोषित करत २१४ धावांची आघाडी मिळवली. सोहम शिंदे आणि अथर्व वानवे यांचे शतक तर अनुराग कवडे चे अर्धशतक होता होता राहिले. तळातील फलंदाज सारीश देसाई ने मात्र चांगले फटके लगावत नाबाद ७० धावा केल्या. दुसऱ्या डावात डी संघ ६० धावा करून देखील अद्यापि १५४ धावांनी पिछाडीवर असून तिसऱ्या दिवशी दोन्ही सामन्यांचे निकाल लागण्याची शक्यता आहे.
संक्षिप्त धावफलक :
[इंदिरा गांधी पार्क स्टेडियम]
एमसीए बी (१): १०८/१० (३८.१)
एमसीए ए (१): २१७/१० (६२.५)
यश बोरामणी १२० (१८५ चेंडू, १८ चौकार) साहिल औताडे ३२, अजय बोरुडे २३
श्रेयस चव्हाण २८/४ बळी, निलय शिंगवी २ तर योगेश चव्हाण सोहन जमाले हर्ष ओसवाल प्रत्येकी १ बळी.
एमसीए बी (२): २५९/१० (५१.३)
सागर पवार ७३, हर्ष मोगावीरा ५०, ऋषिकेश दौंड २२, पेनल्टी ६५ धावा
अभिषेक निषद ४४/४ बळी, शुभम मेड ३१/३ बळी, किरण चोरमले ३५/२ बळी.
[दयानंद कॉलेज ग्राउंड]
एमसीए डी (१): १९६/१० (५४.३)
एमसीए सी (१): ४१०/९ घोषित (८६)
सोहम शिंदे ९३, अथर्व वानवे ८६, अनुराग कवडे ४८, अथर्व डाकवे ३९, सारिश देसाई नाबाद ७०(७३ चेंडू, १२ चौकार,१ षटकार)
ओमकार राजपूत ४७/३ बळी, शुभम खरात ८५/२ बळी, तिलक जाधव अतिश राठोड ओम भाभड अश्कान काझी प्रत्येकी १ बळी.
एमसीए डी (२): ६०/१ (१३)
क्रिश शहापूरकर नाबाद २४, देवराज बेद्रे ३३
अथर्व डाकवे १ बळी.