येस न्युज नेटवर्क : युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या मुख्यालयावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात 200 रशियन पॅराट्रुप्सचा मृत्यू झाल्याचे समजते. युक्रेनच्या प्रादेशिक गव्हर्नरने या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. युक्रेन व्याप्त पूर्वेतील रशियन तळ पाडण्यासाठी सैन्याने हा हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.
युक्रेनच्या लुहान्स्क प्रशासकीय जिल्ह्याचे गव्हर्नर सेर्ही हैदाई यांनी शुक्रवारी टेलिग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, युक्रेनच्या सैन्याने व्यापलेल्या कदिव्का शहरातील एका हॉटेलमध्ये उभारलेल्या रशियन तळावर यशस्वी हल्ला केला. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला सहा महिने पूर्ण झाले असून युद्ध अद्यापही सुरुच आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियाने युक्रेनवर हवाई हल्ला केला. याचा बदला घेत युक्रेनने थेट रशियन मुख्यालयावर हल्ला केला आहे. युक्रेनमधील लुहान्स्क प्रांताचे प्रशासकीय गव्हर्नर सेर्ही हैदाई यांनी शुक्रवारी टेलिग्राम पोस्टद्वारे या हल्ल्यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, युक्रेनच्या सैन्याने कदिव्का शहरातील एका हॉटेलमधील रशियन तळावर यशस्वी हल्ला केला. सध्या युक्रेनच्या पूर्वेकडील भागात रशियाच्या युद्धाचा वेग आता काहिसा मंदावला आहे. गव्हर्नर हैदाई यांनी पोस्टमध्ये इमारतीचा फोटो देखील शेअर केला आहे.