पुणे : आज शुक्रवारी (दि. १०) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी होत आहे. यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती. ती आता पूर्ण झाल्याने आज या प्रकरणाचा निकाल लागला. या निकालानुसार वीरेंद्र तावडेला निर्दोष मुक्त करण्यात आले तर अंदूरे आणि कळसकर यांना जनमठेप आणि पाच लाख दंडांची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच तावडे, विक्रम भावे आणि पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.कोणाचाही खून होणे दुर्देवी. साक्षीदाराची उलट तपासणी घेताना आरोपीच्या वकिलांकडून काही खुनाचा समर्थन करणे अशी वक्तव्य केली केली. ती दुर्देवी. त्यांनी विचार करावा
न्यायालयाने नोंदविले निरीक्षण
डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेने अवघे राज्य हादरले. दाभोलकरांच्या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला. खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू होता.