सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची नागपूर जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आले आहे.
महसूल विभागाने गुरुवारी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये नागपूरच्या अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांची अप्पर जिल्हाधिकारी भंडारा या पदावर बदली केली आहे, सोलापूरच्या तुषार ठोंबरे यांना नागपूरला पाठवण्यात आले. तुषार ठोंबरे हे मूळचे सातारा जिल्ह्यात असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा मतदारसंघ मध्ये सातारा जिल्ह्यातील दोन तालुके येतात त्यामुळे ठोंबरे यांची ही बदली करण्यात आल्याचे कळते.
तुषार ठोंबरे हे नोव्हेंबर 22 मध्ये परत आले होते मागील 14 महिन्यात त्यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज केल्याचे पाहायला मिळाले त्यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार होता त्याचवेळी नूतन महसूल भावनांचे उद्घाटन हे झाले होते.