सोलापूर : त्रिशरण एन्लाइनमेंट फाउंडेशन पुणे या संस्थेच्या संस्थापिका तथा संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीपावली सणानिमित्त सोलापूर शहरातील गोरगरीब निराधारांना फराळाचे वाटप करण्यात आले.
सोलापुर शहराच्या कुमठा नाका परिसरातील बेघर निवारा केंद्रातील निराधारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. त्रिशरण फाउंडेशनचे पुणे विभागीय समन्वयक शितल कांबळे निवारा केंद्राचे व्यवस्थापक अशोक वाघमारे, पत्रकार अमोगसिध्द लांडगे, प्रणिता कांबळे, विकास दूत भाग्यश्री वंजारे उपस्थित होते.
तसेच बसवनगर भवानी पेठ येथील हिंदू मुस्लिम बांधवांसह चर्मकार व लोहार बांधव यांनाही फराळाचे वाटप करण्यात आले. याशिवाय सोलापूर शहराच्या होम मैदान परिसरात अनेक गोरगरीब उघड्यावरती राहतात. या गोरगरीब लोकांना त्रिशरण फाउंडेशन च्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यंदा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रज्ञा वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब वंचित घटकांसोबत यंदा दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.