सोलापूर – हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत ४ लाख ६६ हजार घरावर तिरंगा झेंडा उभा करणेचे नियोजन करा. दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम प्रभावी पण राबवा. जिल्ह्यातील किमान ३० लाख लोक या अभियानात सहभागी करून घ्या असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज ११ तालुक्यांतील गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख यांची बैठक घेणेत आली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड प्रमुख उपस्थित होते.
दि. ९ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कार्यक्रम
………………………
जिल्ह्यात ९ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर देशभक्ती पर गितांचे कार्यक्रम होणार आहे.
संपुर्ण देशात अमृत महोत्सवा निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात ५ लाख ६६ हजार कुटूंबांचे नियोजन
……. …….
हर घर झेंडा उपक्रम अंतर्गत दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा उभारणे साठी नियोजन सुरू आहे. यासाठी सर्व गटविकास अधिकारी यांनी सुक्ष्म नियोजन करावे. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे मार्गदर्शना खाली काही प्रमाणात तिरंगा झेंडे उपलब्ध करून घेणेत येत आहेत. तसेच केंद्र शासना व तसेच बचतगटांचे माध्यमातून दीड लाख झेंडे वितरीत करणेत येत आहेत.
दि. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट स्वराज्य अभियान
……………..
सोलापूर जिलह्यात ९ ऑगस्ट ते १५ऑगस्ट
या कालावधीत स्वराज्य अभियानाचे आयोजन करणेत आले आहे. या निमित्ताने. स्वच्छता मोहिम, घरकुल पुर्ण करणे, बालक सभा, महिला मेळावे, देशभक्ती पर गितांचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाच् आयोजन करा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
ग्रामसेवकांकडून दिरंगाई नको – शेळकंदे
………………….
हर घर तिरंगा उपक्रम सोलापूर जिल्ह्यात ११२३ गावात होणे साठी ग्रामसेवक यांचे कडून नियोजन करणेत आले आहे. याची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. या साठी तालुका संपर्क अधिकारी नेमून याबाबत प्रत्येक कार्यक्रमाची शहनिशा केली जाणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा तर प्रत्येक शासकीय कार्यालयावर तिरंगा झोपडी फडकावयाचा आहे. सर्व कार्यक्रमाचे फोटो केंद्र शासन व राज्य शासनाचे संकेत स्थळावर अपलोड करायचे आहेत. यामध्ये डाटा एन्ट्री आॅपरेटर यांची भुमिका महत्वाची आहे.
उमेद अभियानातूव दीड लाख झेंडे – अतिरिक्त सिईओ
बचत गटाकडून दीड लाख झेंडेचे नियोजन -अतिरिक्त सिईओ धोत्रे
……….
सोलापूर जिल्ह्सात १८ हजार बचतगट या हर घर झेंडा उपक्रमांत सहभागी होणार आहे. उमेद अभियानतून दीड लाख झेंडूचे नियोजन करणेत आले आहे.सर्व बचतगट या मध्ये सहभागी होती त्या दृष्ट्रीने नियोजन करावे असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केले.