भारत सरकारने 22 मे ते पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यास सूचना दिलेले आहेत.


सोलापूर येथील जागतिक पर्यावरण दिन या अनुषंगाने वृक्ष लागवडी सुरुवात झालेली आहे सोलापूर मधील इको नेचर या संस्थेने एनसीसी महाराष्ट्रन बटालियन या जवानासमवेत सोलापुरात वृक्ष लागवड करण्यात आली आहे .कर्नल रणधीर सतीश व कॅप्टन समीर मणियार ,पर्यावरण दूत म्हणून ओळखले जाणारे डॉ मनोज देवकर कॅप्टन शिल्पा लब्बा व सर्व जवान व एनसीसी विद्यार्थी या समवेत सोलापूर शहरातील प्रत्येक शाळेमध्ये व परिसरात वृक्ष लागवड करण्यात येत आहे प्राथमिक सहस्त्र अर्जुन प्रशालेमध्ये व आजूबाजूच्या परिसरात शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली. इको नेचर ही संस्था गेली पंधरा वर्षे वृक्ष लागवड संवर्धन यासाठी कार्यरत आहेत. पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांनी उपस्थित जवान व 500 विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवड ,प्रदूषण मुक्त वातावरण उपाय व योजना यासंदर्भात प्रबोधनही केले व देवकर हे प्रत्येकांना नेचर वॉरियर नेचर योद्धा तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे