आजचे खग्रास चंद्रग्रहण महाराष्ट्रातून दिसणार आहे.होळी आणि चंद्रग्रहण असा दुहेरी संगम यंदाच्या वेळी आला आहे.ग्रहण दुपारी 3:20 वाजता सुरू होऊन संध्याकाळ 6:47 वाजेपर्यंत टिकेल.ही अद्भुत खगोलीय घटना आज सायंकाळी उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेत आल्यावर पृथ्वीची सावली पूर्णपणे चंद्रावर पडते, तेव्हा खग्रास चंद्रग्रहण घडते.या अवस्थेत चंद्र काही काळासाठी तांबूस-लाल दिसतो, त्यामुळे त्याला “ब्लड मून” असेही म्हटले जाते. ग्रहणामुळे महाराष्ट्रातील अनेक मंदिरात आज पूजाअर्चा चे वेळापत्रक बदलले आहे. एकूणच धार्मिक वातावरण आणि ग्रहण पाहण्याची मोठी उत्सुकता खगोल प्रेमींमध्ये आहे.

