भगवान श्रीगणेशाचा जन्मोत्सव दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच विनायक चतुर्थीला साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, पार्वतीचा पुत्र गणेशाचा या तिथीला जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला गणेश जयंती असेही म्हटले जाते.
असे म्हणतात की, विघ्नहर्ता गणेशाच्या जयंती दिनी उपवास व विधीपूर्वक त्यांची पूजा केल्यास संततीसुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते, तसेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्या, दुःखापासून मुक्ती मिळते. बुध-केतूच्या पीडातून मुक्ती मिळते.