तिकीट चेकर एम.बी. शेख यांच्या प्रामाणिकपणामुळे सापडली 32 ग्रॅमची सोन्याची चैन

0
25
  • दि. 18 जाने. 2023 ला सकाळी जळगाव- भुसावळ दरम्यान गाडी क्र. 11039 कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे श्री. एम. बी. शेख ड्युटीवर तिकीट चेकिंग करत होते. कोच बी-1 मध्ये बर्थ नं. 47/55 च्या जवळ पायाला काहीतरी लागले म्हणून खाली बघितले तर ती एक सोन्याची चैन दिसून आली. ती 32 gm ची आहे, हे त्या चैन वरील हॉल मार्कवरुन समजले, त्या चैनची किमत साधारणतः दोन लाखाच्या आस- पास आहे. त्यांनी आजू- बाजूच्या बर्थवर याबाबत विचारपुस केली पण कुणीही या चैनबाबत मालकी हक्क बजावण्यासाठी आले नाही, तेव्हा त्यांनी ती चैन RPF थाना भुसावळ यांना एक मेमो देऊन त्यांच्या स्वाधीन केली.
  • श्री. एम. बी. शेख हे 1995 ला रेल्वेत रुजू झाले. ते सध्या दौंड सेक्शनमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून काम बघत आहेत. त्यांच्या ह्या कामाची प्रसंशा वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक श्री. एल. के. रणयेवले यांनी केली आहे.