येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महापालिकेत गेल्या सात वर्षांपासून गाजत असलेल्या जीआयएस प्रणालीचे मक्तेदार सायबर टेक या कंपनीने सोलापूर महापालिकेला तब्बल तीन कोटी 46 लाख यांचा चुना लावला आहे कोणतेच काम व्यवस्थित न झाल्यामुळे महापालिकेने या सायबर्तेक कंपनीच्या पाच अधिकार्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये महापालिकेचे नोडल ऑफिसर सचिन कांबळे यांच्यासह रामा सुब्रमण्यम ,जयंत पंत, विशाल बळकट ,दिलीप पांचाळ व रोहन जगताप यांचा समावेश आहे. जीआयएस प्रणालीद्वारे सोलापुरातील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण होईल आणि महापालिकेच्या तिजोरीत कोट्यावधी रूपयांचा टॅक्स जमा होईल अशा आणाभाका करून या कंपनीला काम दिले होते मात्र प्रत्यक्षात महापालिकेला तोटाच सहन करावा लागला आहे त्यामुळे महापालिकेने दिलेल्या कामातून काय फायदा होतो हे अधिकाऱ्यांनी सुरुवातीलाच पाहिले पाहिजे