सोलापूर – प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर येथे शुक्रवार दि. 08/08/2025 रोजी सकाळी 10 : 00 वाजता. प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या उपस्थितीमध्ये ‘सामुदायिक रक्षाबंधन महासोहळा’ हर्ष उल्हास मध्ये संपन्न झाला.




सदर कार्यक्रमाद्वारे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी मध्ये स्नेहबंधन वाढवणे व मुलींमध्ये सुरक्षितेची भावना वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात घेऊन सामुदायिक रक्षाबंधन महासोळ्याच्या आयोजन करण्यात आलेहोते. दरवर्षी हा उपक्रम प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
प्रथम यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा व शाळेतील सर्व शिक्षकांचा फेटा व हार घालून स्वागत करण्यात आला. यानंतर या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मान्यवरांना कुंकाचे तिलक लावून राखी बांधण्यात आले. यानंतर विविध शाळेतील विद्यार्थिनींच्या वतीने येथे जमलेल्या विद्यार्थ्यांना कुंकाचे तिलक लावून राखी
बांधण्यात आले.
यावेळी आवेक्षक शाम कन्ना यांची पदोन्नती होऊन विभागीय अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंदचंदनशिवे व सो.म.पा. उपायुक्त रवी पवार यांच्यावतीने फेटा घालुन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सो.म.पा.नगरसेवक गणेश पुजारी,इथास कंपनीचे संचालिका अंजली वाघमारे, श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेचे गांधी , डहाळे , संजय पंडित,रावजी सखाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक केत,रावजी सखाराम प्राथमिक शाळेचे तेली,डांगे, अंजली प्रचंडे,कल्पना सर्वगोड,गोरे,शेख ,वडावराव, अंधारे,तकडे,दमाणी विद्या मंदिर प्रशालेचे शिंदे,बंडगर,जमखंडी, ईश्वरकट्टी,म.न.पा.मुलांची शाळा क्रमांक 11 रीतपुरे , कुंभार , म.न.पा. मुलांची 27 नंबर शाळेचे इंगोले, जगताप,श्राविका महाविद्यालयाचे मोहिकुटकर,हायगोंडे,प्रतिभा कंगळे,श्राविका प्रशालेचे रोहन शहा ,अरिहंत माणिकशेट्टी, सुहास चंचुरे,अनुप कस्तुरे ,शरदचंद्र पवार व कनिष्ठ महाविद्यालयाचे रणदिवे,यशवंत दुधाळ,जाधव,कुंभार,मनपा शाळा क्रमांक 21 चे मुख्याध्यापक वाघमारे,राहुल पवार,मनपा शाळा क्रमांक 16 नरहरी इत्यादी प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमास मुख्य आरोग्य निरीक्षक नरसिंग बच्चू, मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंडगुळे, एस.आय. ताकभाते, भारत बाबरे, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, भारत केत, स्मिता फताटे, अश्विनी काळे, कल्पना सर्वगोड, स्नेहा पवार, कुंभार एस एस, प्रिया व्यवहारे, ॲड. स्वाती मस्के, अमोल अंधारे, प्रकाश सावंत, श्याम कन्ना, बाळासाहेब जगताप, संजय पंडित, महेश जवंजाळ, सुनील गायकवाड, रणदिवे एच.टी. , तकडे ए.जी., ॲड. विशाल मस्के, धीरज वाघमोडे, गौतम नागटिळक मान्यवरांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव यांनी केले.


