सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यावर विमान सेवा सुरू होणार नाही कारण एनटीपीसीची चिमणी देखील विमानसेवेच्या फनेल झोन मध्ये येते असा डीजीसीएने अहवाल दिल्याचे खोटेवृत्त सिद्धेश्वर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी काही दैनिकांमधून छापून आणले होते. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोलापूर विचार मंचचे सदस्य संजय थोबडे यांनी डीजीसीएचे रॉय यांना संपर्क साधून असा कोणता अहवाल कारखान्याला दिला आहे का अशी विचारणा केली. असा कोणताही अहवाल दिला नसल्याचे डीजीसीए कडून सांगण्यात आले . उलट कारखान्याने आपले म्हणणे सादर करण्यासाठी आणखी मुदत मागितली आहे त्यामुळे 31 ऑगस्ट रोजी कारखाना पुन्हा डीजीसीए कडे आपले म्हणणे सादर करणार आहे. महापालिका आयुक्तांकडे देखील काल सुनावणी होती मात्र याला देखील कारखान्याने पुन्हा सात सप्टेंबर पर्यंत मुदत मागून घेतली आहे. आयुक्त पी शिवशंकर यांनी देखील आपल्याकडे डीजीसीएचा कोणताही अहवाल आला नसल्याचे सांगितले. असे असताना काडादि यांनी सोलापूरकरांची दिशाभूल करण्यासाठी खोटेवृत्त छापून आणले मात्र कोणत्याही परिस्थितीत सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडणार आणि विमान सेवा सुरू करणार असा निर्धार संजय थोबडे यांनी व्यक्त केला