सोलापूर: 19 ऑगस्ट रोजी श्री मार्कडेय महामुनी रथ यात्रा मिरवणुक सोलापूर शहरात काढण्यात येत असुन . मिरवणुकीमुळे खालील मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्या ठिकाणी वाहनांमुळे अपघात होवून जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण निर्माण होत असून . त्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे,
त्या अर्थी पोलीस आयुक्त, सोलापूर शहर एम.राज कुमार, यांना प्राप्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चा अधिनियम क्रं. २२ चे कलम ३३ (१) (ब) अन्वये प्राप्त अधिकारान्वये खालील प्रमाणे आदेश देत आहे.
बंद करण्यात आलेला मार्ग (मिरवणुक मार्ग)
पंचकट्टा श्री मार्कडेय मंदिर विजापुर वेस भारतीय चौक- शनिवार पेठ मारुती मंदीरास वळसा घेवून- रत्न मारुती- जंगदबा चौक- पद्मशाली चौक-आंध्रदत्त चौक-सहकारी रुग्णालय भद्रावती चौक- जोडबसवण्णा चौक-मार्कडेय चौक- फैजूलबारी मस्जिद- रांजेद्र चौक-भुलाभाई चौक-नेताजी नगर-चाटला कॉर्नर-जोडभावी पेट-कन्ना चौक-औद्योगिक बँक, साखर पेठ- संयुक्त चौक- भावसार रोड-समाचार चौक-माणिक चौक-विजापूर वेस ते पंचकट्टा हा मार्ग व त्यास जोडणारे मार्गावर वाहतुकीस बंदी राहील.
पर्यायी मार्ग,
१) सात रस्ता – रंगभवन चौक- डफरीन चौक-सरस्वती चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे जाण्यासाठी- येण्यासाठी
२) दत्त चौक – माणिक चौक मधला मारुती बलीदान चौक रुपाभवानी चौक मड्डी वस्ती मार्गे पुढे जाण्यासाठी- येण्यासाठी
३) दत्त चौक लक्ष्मी मार्केट भाजी मंडई पंचकट्टा मलंगशाह वली दर्गा पुनम चौक रंगभवन चौक पासून पुढे जाण्यासाठी – येण्यासाठी
४) रंगभवन- पोटफाडी चौक संत तुकाराम चौक अशोक चौक विव्हको प्रोसेस शांती चौक जुना बोरामणी नाका ते मार्केट यार्ड जाण्यासाठी व येण्यासाठी
सोमवारी सकाळी ०६:०० वा. पासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मार्गावरुन सर्व प्रकारच्या वाहनांना (मिरवणुकीतील वाहने वगळता) येण्यास व जाण्यास बंदी केलेली आहे.
अपवाद वाहने – पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व पोलीस ज्या वाहनांना परवानगी देतील अशी वाहने वगळून)
सदरील हा आदेश पोलीस आयुक्तालयांच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी ठीक सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा आदेश अंमलात राहिल या आदेशाचा भंग केल्यास कायदयाप्रमाणे शिक्षेस प्राप्त होईल असे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी म्हटले आहे..