सोलापूर : पुणे मार्गावरील बाळे पुलाजवळ असलेल्या नेक्सा शोरूम जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील अनिल हरिदास पवार (वय ४२ रा. बीबीदारफळ ता. उत्तर सोलापूर) हे जिप चे कर्मचारी गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात
बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला. अनिल पवार हे जिल्हा परिषद येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सहाय्यक म्हणून काम पाहत होते. काल रात्री १० वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाले होते. बाळे पुलाच्या अलीकडे अनोळखी वाहनाच्या धडकेने से गंभीर होऊन जागीच मयत झाले. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. एमआयडीसी,पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल गुलचंद पवार यांचे ते चुलत बंधू होते. या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली. हवालदार कसबे पुढील तपास करीत आहेत.