गानसम्राज्ञी लता मंगेशकर गेल्या 12 दिवसांपासून रुग्णालयात आहेत. कोरोना पॉझिटीव्ह आणि न्युमोनियाची लागण झाल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. लता दींदीच्या वयामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांच्या प्रकृतीचे वेळोवेळी मॉनिटरींग केले जात असून लता दीदींच्या प्रकृतीत काहीच सुधारणा नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून सर्वांनी प्रार्थना करा असे आवाहन ब्रीच कँडी रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.