जगातलं सर्वात मोठं विमान कसं दिसतं, त्याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, हे पाहण्याची संधी भारतीयांना मिळाली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी उतरले. ‘एअरबस बेलुगा’ (Airbus Bulega) असं विमानाचं नाव आहे. विमानाचे डिझाइन व्हेल माशासारखे आहे. मात्र हे प्रवासी विमान नसून मालवाहू विमान आहे. 51 टन मालवाहू क्षमतेचं आहे. या विमानाची दृश्य आणि फोटो नुकतेच व्हायरल झाले असून सोशल मीडियावर ते वेगाने शेअर केले जात आहेत.
या विमानाची छायाचित्र विमान प्राधिकरणाने ट्विटरवर शेअर केली. अधिकाऱ्यांनी लिहिलंय… मुंबई विमानतळावर एअरबस बेलुगा सुपर ट्रान्सपोर्टर या विमानाचे आगमन झाले. याच्या अत्यंत युनिक अशा डिझाइनबाबत तुम्हाला काय वाटतं…
हवाई दलातील अनेक उत्साहींनी या विमानाचे फोटो आपापल्या साइटवर शेअर केले. या विमानाचे डिझाइन व्हेल माशासारखे आहे.