येस न्युज मराठी नेटवर्क : स्वागत नगर येथील गणेश दुध डेअरीचे पाठीमागील दरवाजाचे कुलूप कापून लाकडी गल्ला व ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम १२,८८० ₹ चोरून नेण्यात आली आहे. १७ मे रोजी सकाळी ११ ते १८ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत ही चोरी झाल्याची फिर्याद प्रवीण बासुतकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे . हवालदार काळे अधिक तपास करीत आहेत.