मराठा सेवा संघाने केली पक्षांना पाण्याची सोय
येस न्युज मराठी नेटवर्क : उन्हाळा चाहूल लागली असून, या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात. त्यामुळे मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्षासाठी पाण्याची सोय केली आहे.त्यामुळे जिल्हा परिषद आवारात पक्षांचा आवाज घुमणार आहे. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद च्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करणेत आली आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाद्वीन शेळकंदे, मराठा सेवा संघ पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव शेंडगे, मराठा सेवा संघ प्रणीत माळशिरस तालुका अध्यक्ष विधीकक्ष अॅड जयसिंगराव पाटील,कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड,संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी संजय जावीर मराठा सेवा संघ जि प शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, कॅस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर,कर्मचारी महासंघ संघटना अध्यक्ष राजेश देशपांडे सेवा संघाचे जेष्ट कार्यकर्ते यशवंत व्यवहारे,जगन्नाथ मुळीक,दिगंबर भगरे ,सुभाष कदम, चेतन भोसले, नवनिर्मीत नर्सेस संघटना अध्यक्ष कविता चव्हाण,सरचिटणीस सुप्रिया जगताप, वासुदेव घाडगे, आप्पासाहेब भोसले, अविनाश भोसले, सचिन पवार, भूषण काळे, अजित देशमुख,शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ, अभिजीत निचळ,देवानंद देशमुख, विठ्ठल मलपे,राहुल कौलगे- पाटील,सुधीर लांडे, सुरेखा जवळकर,संतोष चव्हाण दगडू लोंढे, सुरेश साळूखे,विकास वाघमारे, सैपन जमादार आदि मराठा सेवा संघाचे सदस्य उपस्थित होते.