No Result
View All Result
- मुंबई – विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकरणी दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिले आहे. विरोधी नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी देशद्रोह्यांबरोबर चहापान टाळलं असं विधानं केलं होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
- दरम्यान अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. याप्रकरणी दानवे यांनी स्वत: माहिती दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले, “परवा दिवशी सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला होता. कारण गेली आठ महिने सरकार शेतकऱ्यांसाठी कुठलेही निर्णय घेत नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही बहिष्कार घातला.
- “ह्या गोष्टी सातत्याने होत आल्या आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं होत की बर झालं देशद्रोह्यांबरोबर चहापान टळलं, तर हे देशद्रोही कोण?. हा माझा प्रश्न आहे. आम्ही कोणता गुन्हा केला आहे. त्यामुळे आमच्या अधिकाराचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव दिला,” असे अंबादास दानवे यांनी सांगितले.
- खासदार संजय राऊत यांच्यावर सत्ताधारी पक्षाने हक्कभंग आणला म्हणून आपण आज प्रस्ताव दिला का?, यावर अंबादास दानवे म्हणाले, आम्ही दोन दिवस झाले हा विषय लावून धरला आहे. मात्र हा विषय चर्चेला आला नाही. त्यामुळे पर्यायाने आम्ही हक्कभंगाची नोटिस दिली आहे.
- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ‘महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ’ असं वक्तव्य करणं महागात पडलं आहे. राऊतांविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
No Result
View All Result