जनता विरोधी धोरणे राबवणारे मोदी सरकार चले जाव – कॉ.नरसय्या आडम मास्तर* यांचे जळजळीत उद्गार…..
सोलापूर दिनांक – राज्य आणि केंद्र सरकारच्या खात्यात साठ लाख रिक्त जागा आहेत ते भरले जात नाहीत.नियुक्तीचे पत्र देऊन त्यांना कंत्राटी पद्धतीने राबवले जात आहेत. अशी खरी परिस्थिती या देशात असताना मोदी सरकार दररोज रोजगार दिल्याची पोकळ घोषणा करतात हा विरोधाभास जनतेला मान्य नाही म्हणून जनता आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे.मोदी साहेब आता तरी जागे व्हा, जनता व देश विरोधी धोरणे अंमलात आणलात तर खबरदार आगामी काळात केंद्र सरकारचा पराभव निश्चित आहे, मोदी सरकार चले जाव चा नारा देशभर घुमवू.असा वज्र निर्धार यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.आडम मास्तर यांनी व्यक्त केले. या सरकारच्या विरोधात श्रमिक कष्टकरी,कर्मचारी नागरिकांच्या एक लाख सह्यांचे पत्रक भारत सरकार पाठवत असून याची दखल न घेतल्यास या अधिक आक्रमक आंदोलन आगामी काळात करणार असल्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला.
बुधवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सिटू च्या वतीने देशभर केंद्र सरकारच्या जनता विरोधी धोरणांचा पाडाव करण्यासाठी आक्रमक धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला असून त्या अनुषंगाने सोलापूरात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली व सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट वर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जाहीर सभा समाप्ती नंतर कॉ.आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर चे मा.जिल्हाधिकारी आशिर्वाद कुमार यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन व एक लाख सह्यांचे पत्रक प्रत्यक्ष भेटून भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार कडे मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सुपूर्द केले. यावेळी या शिष्टमंडळात कॉ.एम.एच.शेख, नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख मेजर,दिपक निकंबे, विक्रम कलबुर्गी, अँड.अनिल वासम,दत्ता चव्हाण, अशोक बल्ला, मल्लेशम कारमपुरी, मोहन कोक्कूल,अतुल फसाले परिवहन चे तौफिक शेख, महिबूब शेख, सुरेश बागलकोटे आदी उपस्थित होते.
या आंदोलनात कामगार संघटना संयुक्त कृती समिती,अखिल भारतीय किसान सभा, अखिलभारतीय जनवादी महिला संघटना, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक युनियन, परिवहन कामगार युनियन आदींचा समावेश होतो.
यावेळी प्रजा नाट्य मंडळ कलापथकाने क्रांतिगीते सादर करून आंदोलन कर्त्यात स्फुल्लिंग चेतावले. यानंतर गगनभेदी आवाजात सरकार च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही खालील मागण्या आपणाकडे सादर करत आहोत. सदर मागण्यांची आपण तातडीने पूर्तता करावी अन्यथा आपल्या सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी, जनविरोधी व देश विरोधी धोरणाच्या विरोधात राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर तीव्र स्वरूपाचे प्रदीर्घ आंदोलन केले जाईल. तसेच श्रमिकांच्या विरोधात धोरणे अंमलात आणत असल्यामुळे पुढील काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये अशा धोरणांचा पराभव करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू मागण्या :-
१. कामगार कर्मचारी विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा.
२. केंद्र सरकारचे राष्ट्रीय संपत्ती व सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण व विक्री
करण्याचे धोरण मागे घ्या. नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनचे धोरण रद्द करा. ३. शासकीय, निमशासकीय विभाग, नगरपालिका, महापालिका व खाजगी उद्योग व आस्थापनामध्ये हंगामी, कंत्राटी, रोजंदारी व मानधनावरील अंगणवाडी, आशा, शालेय पोषण इत्यादी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कायम करा.
४. महाराष्ट्र शासनाचा आऊट सोर्सिग द्वारे नोकर भरती करण्याचा शासन निर्णय रद्द करा. कामगार विषयक त्रिपक्षीय समित्या व विविध मंडळावर कामगार संघटनाचे प्रतिनिधी घ्या.
५. आठ तासाच्या कामासाठी दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन निश्चित करा.
६. असंघटित क्षेत्रातील यंत्रमाग, रेडीमेड व शिलाई, बांधकाम, रिक्षा व ट्रोली चालक, भाजी व फळे विक्रेते, चारचाकी व टपरीवाले, माथाडी, सफाई घरेलू इदयादी कामगारांना किमान वेतन, सेवा शर्ती व पेन्शन, विमा, इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करण्यासाठी माथाडीचे धरतीवर कल्याणकारी मंडळ स्थापन करा व योजनांसाठी निधीची तरतूद करा
७. सर्व नागरिकांना ( ईपीएफ पेन्शनधारकांसह) दरमहा दहा हजार रुपये किमान पेन्शन लागू करा. सरकारी निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
८. महागाई रोखा, सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करा, रोजगार निर्माण करण्यासाठी योजना आखा, बेरोजगारांना बेरोजगार भत्ता दया.
९. शेतक-यांच्या उत्पादनाला हमी भाव दया, गरीब व मध्यम शेतकरी आणि शेतमजुरांचे
संपूर्ण कर्ज माफ करा. १०. ग्रामीण व शहरी भागात दरवर्षी २०० दिवस रोजगार हमी मार्फत काम दया व प्रतिदिन ६००/- रुपये मजुरी दया.
११. सर्व ज्येष्ठ नागरिकांना किमान १०,०००/-रुपये मासिक पेन्शन द्या. १२. दिव्यांगाना सामाजिक सुरक्षा दया, घरकुल व निर्वाह भत्त्याच्या अनुदानात वाढ करा.
१३. विडी व यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाची अमलबजावणी करा आणि त्यांच्यासाठी कल्याणकारी निधी उपलब्ध करून दया. १४. शिक्षणाचे बाजारीकरण व नवीन शिक्षणिक धोरण रद्द करा. सर्वाना मोफत व दर्जेदार शिक्षण दया..
१५. बेरोजगार युवकांना काम उपलब्ध करून द्या व काम मिळेपर्यत बेरोजगार भत्ता द्या. १६. महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकावरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करा व अस्तित्वात असलेल्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा. इ.
अँड.एम.एच.शेख यांनी सरकारच्या धोरणांविरुद्ध सडकून टीका करताना म्हणाले की, सरकार नमवण्यासाठी कामगार- कर्मचारी मजबूत आहे. त्याचा अंत पाहू नका अशी भूमिका प्रास्ताविकात मांडले. पुष्पा पाटील, अशोक इंदापुरे आदींनी सभेला संबोधित केले.
यावेळी मंचावर नलिनीताई कलबुर्गी, अशोक इंदापुरे, व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी,शेवंता देशमुख,कुरमय्या म्हेत्रे, नसीमा शेख, युसूफ मेजर फातिमा बेग, पुष्पा पाटील , अँड एम.एच शेख, अँड अनिल वासम आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.
सदर आंदोलन यशस्वी होण्यासाठी सनी शेट्टी, नागेश म्हेत्रे बाळकृष्ण मल्याळ, अभिजित निकंबे, विल्यम ससाणे, बापू साबळे, रफिक काझी,आप्पाशा चांगले, प्रभाकर गेंट्याल, अफसना बेग व गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेचे सर्व पूर्णवेळ कार्यकर्ते, विरेंद्र पद्मा, रंगप्पा मरेड्डी,श्रीकांत कांबळे,अमित मंचले,लिंगवा सोलापूरे, इलियास सिद्दीकी,अकील शेख, दाऊद शेख, नरेश दूगाने, बजरंग गायकवाड राजेश काशीद, अमोल काशीद, युसूफ कालु, शेख,धनराज गायकवाड जावेद सागरी, हुसेन शेख नितीन कोळेकर, नितीन गुंजे,आसिफ पठाण,शाम आडम, किशोर झेंडेकर आदींनी परिश्रम घेतले.