जिल्हा परिषदेत “माझी माती माझा देश” उपक्रमा अंतर्गत पंचप्रण शपथ

0
65

सिईओ आव्हाळे यांचे उपक्रमांत सहभागी होणेचे आवाहन

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज क्रांतीदिनानिमित्त “माझी माती माझा देश” उपक्रमा अंतर्गत पंचप्रण शपथ देणेत आली. सिईओ मनिषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, यांचे सह विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
प्रांरभी जिल्हा परिषदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आहेत. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी. पंचप्रण ची शपथेचे वाचन केले.

शिस्त पाळा, प्रलंबित कामाचा निपटारा करा – सिईओ आव्हाळे
पंचप्रण शपथ कर्मचारी यांनी जीवनात अंगाकारा. पुन्हा पुन्हा स्मरण करा. वेळेत कार्यालयात या. प्रलंबित कामांचा निपटारा करा. असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे जयंती दिनी उशीरा येणारे कर्मचारी यांना आज सिईओ आव्हाळे यांनी शिस्तीचे बोल सुनावले. ९ आॅगष्ट क्रांती दिना निमित्त सर्व कर्मचारी एकत्र आले होते. मागच्या आठवड्यात उशीरात आलेले कर्मचारी यांना थांबवून त्यांनी सुधरणा करणेबाबत सुचना दिल्या. कामात सुधारणा नाही झाले तर सेवा पुस्तकात नोंद घेण्यात येईल. विना वेतन करणेस देखील मागे पुढे पाहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सुनावले.