सोलापूर : आरटीओ कार्यालयात एम वारंवार बंद पोर्टल परिवहन पडण्यामुळे रिक्षाचालकांना कागदपत्रे बनवण्यासाठी अडथळा येत आहे. यामुळे रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवावी, अशी मागणी राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मेहबूब कादरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षाचालकांवर कारवाई केली जात शहरात आहे.
यासाठी कागदपत्रे काढण्यासाठी आरटीओमध्ये गेले असता एम. परिवहन हे पोर्टल वारंवार बंद होण्यामुळे आणि कागदपत्रे नसल्याने रिक्षाचालकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी काही कालावधी दिला जावा, असे रिक्षाचालकांचे म्हणे आहे. यावेळी राजेश राऊळ, मेहबूब कादरी, अमीर शेख उपस्थित होते.