दक्षिण सोलापूर : गेले चार वर्ष दक्षिण मतदार संघाची बांधणी करणारे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील हे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्याचे नियोजन करून मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यासाठी गुरुवारी ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ खा. संजय राऊत येणार सोलापुरात येणार असून ते पाटील यांच्या उमेदवारीचा बॉम्ब टाकणार का याची उत्सुकता लागली आहे. अमर पाटील यांनी दक्षिणमधून
मतदारसंघाच्या बांधणीला सुरवात केली. त्यांनी १०० शाखांच्या उद्घाटनाचा महत्वाकांक्षी संकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोहचला आहे..या निमित्त संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन केले. निर्मिती लाँस येथे गुरुवारी होणाऱ्या मेळाव्याला जवळपास पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात खा. राऊत या मेळाव्यात अमर पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करणार का यांची उत्सुकता आहे.त्यांनी १०० शाखांच्या उद्घाटनाचा महत्वाकांक्षी संकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे.
दक्षिणवर सेनेचा भगवा फडकवूः पाटील
केंद्र आणि राज्य सरकारच्या जुलमाविरोधात थेट लढा देणारे, खोट्या खटल्यात तुरुंगावास स्वीकारूनही न झुकणारे लढवय्ये नेते संजय राऊत यांना मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्याचे निश्चित केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दक्षिणवर सेनेचा भगवा फडकवू, असे अमर पाटील यांनी पत्रकार परिषेद सांगितले.