नाशिक : हॉस्पिटलमधून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधील एका हॉस्पीटलमधून समोर आला आहे. डॉक्टरच्या हातून एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
नाशिकमधील वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटल मधला हा प्रकार आहे. नवजात बालकावर उपचार करताना डॉक्टरच्या हातातून बाळ पडून मृत्यू झाल्याचा आरोप बालकाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. उपचारादरम्यान डॉक्टरच्या हातून बाळ खाली पडलं. डोक्याला मार लागल्यानं बाळाचा जागीच मृत्यू झाला. बाळाच्या डोक्यातून रक्त येत होतं आणि त्यानं जागीच जीव सोडला.