मयूर क्लासिक AC बँक्वेट हॉल, जुळे सोलापूर येथे शनिवार दि. 7/10/23 ते शुक्रवार दि. 13/10/23 या काळात भव्य नारदीय कीर्तन महोत्सव २०२३ पार पडला. स्वरुप सखी मंडळ व अनादि केटरर्स यांनी 8 वर्षं ही परंपरा जपली आहे. कै. सौ. सुनीति बल्लाळ दाते यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते.

यावर्षी संपूर्ण नियोजन स्पाईस एन आईस इव्हेंट्स यांच्याकडून करण्यात आले होते हरिभक्तांसाठी खास लकी चौक ते मयूर क्लासिक AC बँक्वेट हॉल पर्यन्त बसची सोय करण्यात आली होती.

सर्वच कीर्तनकारांनी अतिशय सुरस कीर्तन आणि भगवद् गायन केले. 6 वर्षांच्या आरोही सहस्रबुद्धे हिने – टाळ बोले चिपळीला, अबीर गुलाल, महिषासुरमर्दिनी स्तोत्र इ. सादर करून श्रोत्यांची मनं जिंकली. ह. भ. प. विद्यावाचस्पती श्री. चारुदत्त आफळे यांच्या रसाळ कीर्तनाने या महोत्सवाची सांगता झाली. आफळे बुवांनी कीर्तनातून किमान 5 वेळा भगवंताचे स्मरण, आपले पालक म्हणून कर्तव्य आणि कर्तव्य करत राहणे या गोष्टी अधोरेखित केल्या. अतिशय सुंदर पर्वणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आलेल्या प्रत्येकाने आयोजकांचे आभार मानले.