कॅनबेरा | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज 2 (डिसेंबर) तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात विजयासह मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा तिसरा सामना प्रतिष्ठेचा झाला आहे. या तिसऱ्या सामन्यात काही बदल करण्यात आले आहेत. या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज थंगारासू नटराजनला संधी देण्यात आली आहे. थंगारासूने टीम इंडियाकडून वन डे पदार्पण केलं आहे. थंगारासू टीम इंडियाकडून पदार्पण करणारा 232 वा खेळाडू ठरला आहे. तिसऱ्या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीने आपल्या हस्ते थंगारासूला कॅप दिली.
थंगारसूने आयपीएलच्या 13 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादकडून दमदार कामगिरी केली. हैदराबादचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापग्रस्त झाल्याने त्याला या मोसमाला मुकावे लागले. यानंतर थंगारासूने दमदार गोलंदाजी केली.