अख्खा भारत देश आज दिव्यांनी नाहून निघाला आहे. गोरगरिबांच्या घरापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. अयोध्येतील शरयू नदीकाठ तब्बल 26 लाख दिव्यांनी उजळून निघाला. पंढरीत चंद्रभागा नदी काठावर देखील मोठ्या प्रमाणावर दिवे लावण्यात आले होते. या प्रकाश पर्वा निमित्त पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर अक्कलकोट ही भक्ती स्थळे विद्युत रोषणाईने सजली आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना सलग आलेल्या सुट्ट्या… सोलापूर जिल्ह्यातील पूर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या तब्बल सहा लाख 4 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 832 कोटींची शासनाकडून जमा होऊ लागलेली मदत.. आणि बाजारपेठेतील खरेदीचा उत्साह सर्वांच्या मनामध्ये चैतन्य आनंद आणि समृद्धी निर्माण करेल. आजच्या चतुर्थी पासून .. भाऊबीजेपर्यंतच्या या आनंद पर्वा निमित्त येस न्यूज मराठीच्या youtube चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम वरील कोट्यावधी दर्शकांना आणि आमच्या जाहिरात दारांना लक्ष लक्ष शुभेच्छा..






