रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा २०२५–२६ या रोटरी वर्षासाठीचा अधिष्ठापन समारंभ हॅच फ्री मेसन हॉल येथे संपन्न या वेळी रोटेरियन संतोष सपकाळ यांनी अध्यक्षपदाची तर रोटेरियन इंजि. युगंधर जिंदे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.समारंभ डिस्ट्रिक्ट गवर्नर इलेक्ट रोटेरियन जयेश पटेल यांच्या शुभहस्ते आणि सहायक प्रांतपाल रोटेरियन अजय दोईजोडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमात नव्याने नियुक्त केलेल्या २०२५–२६ वर्षाच्या संचालक मंडळाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या मध्ये क्लबचे उपाध्यक्ष, विविध सेवा प्रकल्पांचे संचालक, सदस्यविकास, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यावरण, फेलोशिप, पोलिओ प्लस, स्पोर्ट्स व सांस्कृतिक, अशा अनेक विभागातील जबाबदाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
रोटेरियन जयेश पटेल यांचे हस्ते चार नवीन सदस्यांना क्लबमध्ये समाविष्ट करण्यात आले. या कार्यक्रमास मावळते अध्यक्ष डॉक्टर जानवी माखिजा, हीरालाल डागा, राजगोपाल झंवर, संचालक सुनील दावडा, संतोष भंडारी, आरती गांधी, आसावरी सराफ, ललिता शितोळे, डॉक्टर निहार बुरटे, डॉक्टर बाळासाहेब शितोळे, पवन अगरवाल, प्रशांत अपराध, संजीव मेंटे, स्वप्नील कोंडगुळे इत्यादी उपस्थित होते.