सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त यंदा काढण्यात येणारी जयंती मिरवणूक १९ एप्रिल रोजीच काढण्याचा निर्धार समाजबांधवांनी केला. मध्यवर्ती मंडळे दोन असली तरी मिरवणूक एकाच दिवशी काढण्यात येणार असल्याचे शुक्रवारी बैठकीत स्पष्ट करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे शुक्रवार 3/4/2026 रोजी सायंकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धम्मरक्षिता (ताई )कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

प्रथम या आढावा बैठकीच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धम्मरक्षीताताई कांबळे, मंदाकीनीताई शिंगे ,मीनाक्षीताई बनसोडे, सुमित्राताई जाधव, ज्योतीताई वाघमारे, हेमाताई वाघमारे, मंगलताई दोड्यानूर, कल्पना सुरवसे या उपस्थित महिलांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन आढावा बैठक सुरुवात करण्यात आली.आनंद (दादा) चंदनशिवे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्यांच्या वाढदिवशी सोलापुरातील मिलिंदनगर येथून मिरवणूक काढण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा सोलापूर शहराने जपली आहे. दरवर्षी ही मिरवणूक मोठ्या दिमाखात काढली जाते. ती पाहण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यांसह कर्नाटक, तेलंगणा,पारंपरिक मार्गाने मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक परंपरेनुसार पारंपरिक मार्गानेच काढली जाईल.


यंदाची मिरवणूक भव्य आणि दिव्य स्वरूपाची असेल. सर्व समाजबांधवांनी १९ एप्रिल 2026 रोजी मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन आनंद चंदनशिवे यांनी केले.आंध्र प्रदेश तसेच दिल्ली येथूनही नागरिक येतात. परदेशातूनही अनेक जण खास उपस्थित राहतात. प्रतिष्ठापनेनंतर येणाऱ्या रविवारी मिरवणूक काढण्याची परंपरा सर्वपरिचित आहे. हजारो नागरिक सोलापूरला येण्यासाठी रेल्वे, बस व विमानांची तिकिटे आधीच आरक्षित नियमानुसारच डीजेचा आवाज ठेवणार १ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळूनच मंडळांकडून डीजेचा वापर केला जाईल. मिरवणूक भव्य व दिव्य स्वरूपात काढली जाईल, असे सांगण्यात आले.

मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रत्येक मंडळाला १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर मिरवणूक पुढे सरकवली जाईल. नियमांचे पालन सर्व मंडळांनी करावे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. करतात. रविवार हा दिवस सर्व समाजबांधवांसाठी सोयीचा असल्याने त्याच दिवशी मिरवणूक काढली जाईल, असेही बैठकीत नमूद करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्तअध्यक्ष आनंद चंदनशिवे, सचिव रॉकी बंगाळे, विश्वस्त माजी अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, दशरथ कसबे, पिंटू ढावरे, मिलिंद प्रक्षाळे, सिद्धेश्वर पांडगळे, रसूल पठाण तसेच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळ उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश इंगळे, विनोद वाघमारे, अजित बनसोडे, दीपक गवळी, शांतीकुमार नागटिळक, अजित गादेकर, गौतम चंदनशिवे, सुहास सावंत, अशुतोष नाटकर, रविकांत कोळेकर,विजयानंद काळे,चंद्रकांत सोनवणे, अश्विन शिंदे, बाळासाहेब थोरात, किरण साळवे, अजय मैंदर्गीकर,विकी शेंडगे, धम्मपाल मैंदर्गिकर, दीपक नागटिळक,अँड. विशाल मस्के, अँड.मलिक कांबळे, सुजित अवघडे, लखन भंडारी, पप्पू लोंढे,प्रमोद चंदनशिवे, देविदास चिंचोळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पप्पू गायकवाड यांनी केले.
