सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील बाळू बाबू कोले यांनी टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल अविचाराने आणि भरधाव वेगाने चालवून रस्त्यावर उभ्या असलेल्या खडी अंथरण्याचे काम करणाऱ्या ग्रेडर मशीनला पाठीमागून धडक देऊन स्वतः जखमी होऊन स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात मदन प्रसाद मोर्य यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.