No Result
View All Result
- राज्यात बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला असून अद्यापही थंडीचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली आले आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशावर आला आहे. अनेक ठिकाणी धुके पडले आहे. त्यामुळं वाहन चालवतना अडचणी निर्माण होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही गारठा कायम आहे. पुण्याचे तापमान 10 अंशावर आले आहे, तर सातारा जिल्ह्याचे तापमान 14 अंशावर आले आहे. वाढत्या थंडीचा मानवी जीवनावर देखील परिणाम होत आहे. थंडीमुळं सर्दी खोकला यासारख्या समस्या उद्भवत आहेत. थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.
- मराठवाड्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. औरंगाबादमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर परभणीत 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीत 19 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी किंचीत तापमानात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अद्यापही कायम आहे. तसेच अनेक ठिकाणी धुके पडल्यामुळं वाहन चालवताना अडचणी निर्माण होत आहेत. राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम आहे.
No Result
View All Result