सोलापूर – 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वनविभाग सोलापूर यांचेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस धैर्यशिल पाटील, उपवनसंरक्षक सोलापूर (प्रा.) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली गवताळ प्रदेशातील परिसंस्था (Grassland Ecosystem) व सोलापुर जिल्ह्यात आढळणारे वन्यजीव या विषयावर सुंदर चित्ररथ साकारण्यात आला होता. त्याचे सादरीकरण व नेतृत्व गंगाधर विभुते, वनरक्षक वाघदरी यांनी शासकीय परेड मैदानावर केले. नंतर मुलांनी हा चित्ररथ पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याने या चित्ररथाचे रूपांतर सेल्फी आणि फोटो पॉइंटमध्ये झाले. या चित्ररथासाठी शंकर कुताटे, वनपाल सोलापूर, श्रीहरी पाटील, वनरक्षक सोलापूर व वाहनचालक कृष्णा निरवने यांनी विषेश परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास मा. सहा. वनसंरक्षक लक्ष्मण आवारे व बाबा हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी खलाने व वन विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.