पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली होती. करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या संपूर्ण देशासह जगाचं लक्ष पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलं असतानाच ही आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.