No Result
View All Result
- सोलापूर – आण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांनी बेकायदेशीरपणे आपल्या पदाचा गैरवापर करून महामंडळाच्या निधीचा अपहार करण्याच्या गैरहेतूने रमेश कदम यांची आजी श्रीमती बायमा गणपत शिरसागर रा.नांदनी, ता बार्शी,जि.सोलापूर यांच्या नावाने दुग्ध व्यवसायाचे कर्ज मंजुरीचे बेकायदेशीर आदेश तयार करून कर्ज मंजूर केलेले आहे, असे खोटे भासवून ते खरे म्हणून वापरून सदरचे आदेश महामंडळाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे व इतरांवर दबाव टाकला व रक्कम रुपये 4,75,000 चा धनादेश दिला, त्यावरून महामंडळाची व सरकारची फसवणूक केल्याची फिर्याद अनिल राघोबा म्हस्के यांनी 31/5/2017 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती.
- पोलिसांनी माजी आमदार रमेश कदम यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता, सदर प्रकरणाच्या तपासासाठी दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपी माजी आमदार रमेश कदम यांचेतर्फे युक्तिवाद करताना आरोपीकडून काहीही हस्तगत करण्याचे नसल्याने तसेच सदरचा गुन्हा हा कागदोपत्री पुराव्याचा भाग असल्याने पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. पांढरे यांनी पोलिसांनी मागणी केलेली दोन दिवसांची पोलीस कोठडी फेटाळून आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पारित केले.
- यात आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे,ऍड. विनोद सूर्यवंशी एडवोकेट दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे ऍड.दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.
No Result
View All Result