अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शतकमहोत्सवी विभागीय नाट्यसंमेलन दिनांक 26,27,28 जानेवारी मध्ये सोलापुरात होणार आहे या संमेलनाच्या जागेची पाहणी करण्यासाठी मुंबईहुन समिती सोलापुरात दाखल झाली आणि या समितीने हरिभाई देवकरण प्रशालेचे मैदान व नार्थकोर्ट मैदानाची पाहणी केली व त्या समितीने नॉर्थकोर्ट मैदान हे संमेलनासाठी निश्चित केले
सदर समितीमध्ये आ.भा.म.ना.परिषद मुंबई कार्यकारणी सदस्य विशाल शिंगाडे,शिवाजी शिंदे,तेजस्विनी कदम हे होते त्याच बरोबर जागेची पाहणी करण्यासाठी विभागीय संमेलनाचे निमंत्रक प्रा.शिवाजीराव सावंत, संमेलनाचे कार्याध्यक्ष मा. प्रकाश यलगुलवार सर , प्रमुखकार्यवाह विजयकुमार साळुंके,कोषाध्यक्ष दिलीप कोरके, कार्यवाह ज्योतिबा काटे,प्रशांत शिंगे, सुमित फुलमामडी ,यतीराज वाकळे,,रंगकर्मी शशिकांत पाटील,विठ्ठल बडगंची,हरिभाऊ चौगुले,राजासाहेब बागवान,आशुतोष नाटकर,दत्तात्रय जगताप,किरण लोंढे, आदी उपस्थित होते.
या प्रसंगी विभागीय संमेलनाचे निमंत्रक प्रा.शिवाजीराव सावंत यांनी सोलापुरात होणाऱ्या विभागीय संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या व या संमेलनासाठी लागणारी मदत ही सर्वतोपरी करण्याचे आश्वासन दिले.
तसेच विभागीय संमेलनाचे कार्यध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी सावंत सरांनी मदत करण्याचे आश्वासन दिले त्या बद्दल त्यांचे आभार मानले तसेच मुंबईवरून आलेल्या पाहणी समितीचे आभार मानले
प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके यांनी संमेलनाची तयारी संदर्भात सविस्तर विवेचन करून पूर्वतयारी मध्ये जमेच्या बाजूची राहिलेल्या गोष्टीची माहिती दिली व सर्वांचे आभार मानले.