सोलापूर : सोलापुरात विमानसेवा नसणे आणि राजकीय नेतृत्वाने देखील दुर्लक्ष करणे यामुळे उद्योग क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र – 2 अंतर्गत तब्बल 61 हजार 42 कोटी रुपयांचे उद्योग करार झाले आहे. रस्त्याचे उत्तम चौपदरीकरणाचे जाळे असताना आणि रेल्वेची उत्तम सेवा असतानादेखील केवळ विमानसेवा नाही यासाठी उद्योजकांनी सोलापूर कडे पाठ फिरविली आहे. इथले सध्याचे उद्योजक तसेच नवे निर्माण होणारे उद्योजक देखील पुण्या-मुंबईकडे जात आहेत. त्यामुळे आता तरी सोलापूरच्या राज्यकर्त्यांना याबाबत जाग येईल का हा खरा प्रश्न आहे जयंती पुण्यतिथी आणि मिरवणुका यावरच 365 दिवसांपैकी अडीचशे दिवस वाया घालवणारे सोलापूरकर अजूनही गंभीर नाहीत. इथल्या तरुण मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होत आहेत त्यामुळेच गेल्या दहा वर्षात सोलापूरची लोकसंख्या दोन लाखांनी देखील वाढली नाही. ही चिंताजनक बाब आहे