सोलापूर (प्रतिनिधी) ः येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा 90 वा वर्धापन दिन सोमवारी 2आॕगष्ट रोजी महिला, युवक व मुख्य शाखा पदाधिकारी तसेच सदस्यांच्या स्नेह मेळाव्याने उत्साहात साजरा झाला.
सुरवातीला प्रमुख पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीसंत समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी रोहिणी तडवळकर, डाॕ.अजीतकुमार देशपांडे, रामभाऊ तडवळकर, संस्थेचे अध्यक्ष डाॕ.श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष हरिभाऊ जतकर, शंकरराव कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह श्याम जोशी, खजिनदार सतीश पाटील, सहकार्यवाह श्रीकांत तुळजापूरकर, प्रा.किरण कुलकर्णी , कार्यकारिणी सदस्य डाॕ. नभा काकडे, दत्तात्रय आराध्ये, विजय कुलकर्णी , महिला शाखाध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष सुनिल हरहरे तसेच महिला शाखेच्या पदाधिकारी अॕड.मंगला चिंचोळकर , ॲड. कुरनुरकर, शलाका कुलकर्णी, क्षितीजा गाताडे, युवक शाखेचे कार्यवाह सुशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यवाह श्याम जोशी यांनी संस्थेच्या शतक महोत्सवी दशकात “युवा जोडो अभियान” राबवणेची संकल्पना मांडली. अध्यक्ष डाॕ.येळेगावकर, दत्तात्रय आराध्ये यांच्यासह उपस्थितांनीही मनोगत व्यक्त केले.