सोलापूर: भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याचे १८ वा अग्निबॉयलर प्रदीपन कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांच्या हस्ते आज रविवार रोजी सकाळच्या दरम्यान कार्यस्थळावर कारखाना झाली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख म्हणाले की, एकरी उत्पादन वाढवल्याशिवाय शेतकर्यांना पर्याय नाही, उत्पादन खर्च वाढल्यामुळे ऊस पिकाचे अर्थकारण कोलमडलेला आहे. एकरी उत्पादन वाढवले तरच शेतकरी व कारखाना या दोघांनाही फायद्याचा आहे. यासाठी शेतकऱ्यांना सुधारित ऊसाचे बियाणे पुरवण्यात येत असल्याचेही कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सांगलीचे गन्ना मास्टर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व ऊस पीक तज्ञ डॉ अंकुश चोरमुले, सेंद्रिय शेतीतज्ञ जयसिंगपूरचे डॉ. शांतीकुमार पाटील, ऊस भूषण शेतकरी सोमनाथ हुलगे यांनी शेतकर्यांना ऊस पिकाची लागवड आणि लागवडीनंतर कोणती काळजी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले. शिवाय सरासरी एकरी उत्पादन वाढण्यासाठीच्या नियोजनाची देखील माहिती देण्यात आले. एकरी दीडशे टन सुध्दा ऊसाचे सरासरी उतारा पडू शकतो मात्र ऊस पिक नियोजन खुप महत्वाचा असल्याचेही या तिघांनी सांगितले.
यावेळी शेतकर्यांसाठी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमधील विजेत्या शेतकर्यांना दुचाकीसह अन्य बक्षिसाचे वितरणही करण्यात आले. या प्रसंगी लोकमंगल साखर कारखानाचे अध्यक्ष महेश देशमुख सचालक पराग पाटील, दीपक नलवडे, डॉ अंकुश चोरमुले, जयसिंगपूरचे डॉ. शांतीकुमार पाटील, ऊस भूषण शेतकरी सोमनाथ हुलगे, सरपंच भिमाशंकर बबलेश्वर, यतीन शहा, तांत्रिक अधिकारी गजराज रूद्रमठ, प्रोसेसिंग अधिकारी जी. गुणाशेखरन, किशोर जोशी, विठ्ठल देशमुख, एम. पद्मराज, विठ्ठल बिटे, इक्बाल शेख, विवेक पवार, नंदकिशोर कदम, श्रीशैल लोखंडे, सुरक्षा अधिकारी श्रीशैल कासे आणि कपिल सिंदखेडे तसेच यावेळी सादेपुर ,बाळगी, निंबरगी ,भंडारकवठेसह अन्य गावातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.