No Result
View All Result
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी झालीय. काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावलीय. मात्र या बैठकीला ठाकरे गट जाणार नाही. सावरकरांवरुन राहुल गांधींनी जी टीका केली. त्यामुळे या बैठकीला न जाण्याचा निर्णय ठाकरे गटानं घेतलाय. खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिलीय.
- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा लढा गुलामगिरीविरोधात होता हे विसरू नका असं संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना ठणकावलंय. आम्ही सोबत आहोत पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही हे राहुल यांची भेट घेऊन त्यांना सांगणार असल्याचं राऊत म्हणाले. तर समान किमान कार्यक्रमात सावरकर हा मुद्दा नव्हता असं सांगत नाना पटोलेंनी सावरकर या विषयावर बोलणं टाळलं.
- त्याआधी काल मालेगावत झालेल्या जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सावरकारांच्या वाड्यात मी लहानपणी गेलो होतो. सावरकरांचं काम येड्या गबाळ्याचं काम नाही. सावकरांनी देशासाठी बलिदान दिलंय. त्यांनी 14 वर्ष यातना सोसल्या. आपण एकत्र आलोय ते संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सावकरांनी छळ सोसला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. सावरकर आमचे दैवत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावलं आहे.
No Result
View All Result