सोलापूर – सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेले उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पलाची पाहणी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली. उजनी येथेली पंप हाऊस,उजनी दुहेरी पाईप लाईन,पंपींग मशीनरी, जॅकवेलची,बी.पी.टी इत्यादी ची पहाणी केली.या वेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाड कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक रंगाराव,सिद्धेश्वर उस्तुर्गे, नितीन अंबिगार. जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, हरीश व नदाफ मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील, स्मार्ट सिटीचे सहायक अभियंता उमर बागवान, चेतन भोसले यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात येत आलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाच 110 किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे शहराला १७० एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे. शहराच्या पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व ६ पंपांची प्राथमिक पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे.
उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात ११५० अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्यात आले असून आज ११५०आश्वशक्ती क्षमतेचे १ पंप प्रथमिक चाचणी करीता सुरु करण्यात आले. या एका पंप द्वारे सोलापूरपर्यत किती वेळेत किती MLD पाणी पोहोचणार आहे.याची चाचणी घेण्यात येणार त्यानंतर टप्या टप्याने सर्व पंप सुरु करण्यात येणार आहे. अंतिम पंपाची चाचणी लवकरच करण्यात येईल अशी महिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणीपुरवठा होईल.नदी वाटे जे पाणी वाया जात होते त्यात बचत होऊन ते पाणी शेत करण्याऱ्या शेतकरी पर्यंत पोहचले.





