सोलापूर – संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत करमाळा तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीची विभागीय स्तरावरील तपासणी करणेत आली.
आज करमाळा तालुक्यातील खडकी येथे विभागीय उपायुक्त विकास विजय मुळीक यांचे अध्यक्षतेखालील समितीने या ग्रामपंचायतीची तपासणी केली. ग्रामपंचायती अंतर्गंत स्वच्छता, पाणी व पाणी गुणवत्ता, शौचालय व्यवस्था, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गाव परिसर स्वच्छता, वृक्षारोपण आदी कामांची पाहणी समितीने केली. लोकसहभागातून राबविलेल्यै विविध कामांची पाहणी तसेच वैयक्तिक स्वच्छतेची पाहणी केली.
या पथकांमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान विभागीय तपासणी समितीमधील विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपआयुक्त (विकास) विजय मुळीक
उपआयुक्त (विकास),सहाय्यक आयुक्त (विकास),सोनाली घुले ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव,विभागीय माहिती व जन संपर्क कार्यालयाचे उपसंचालक डॉ.पुरूषोत्तम पाटतकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता गाडेकर ,गट विकास अधिकारी राजाराम भोंग ,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , संवाद सल्लागार सचिन सोनवणे, क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे ,विस्तार अधिकारी ए.डी.थोरात , सीआरसी उमेश येळवणे ,सरपंच चंद्रकला बरडे , उपसरपंच अंगद शिंदे , ग्रामसेविका आर.एन.उंडे उपस्थित होते.
उपायुक्त विजय मुळीक यांना घरकुलांचे पाहणी केली. खडकी गावातील महिलांनी. परसबागा करून दारात रोज चा लागणारा भाजीपाला तयार केला आहे.सरपंच चंद्रकला बरडे, उपसरपंच अंगदा शिंदे , ग्रामसेविका रंजना उंडे , ग्रामसेवक बापू दौंडे , दत्तात्रय निकम , अनिल कब्जेकर , सागर इंगळे , राम बडे , प्रविण साबळे , अमोल सरडे, मनोज लटके उपस्थित होते.
खडकीने केली दहा हजार वृक्ष लागवड…!
सोलापूर जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेल्या खडकी ग्रामपंचायतीने सिईओ दिलीप स्वामी यांचे हाकेला दाद देत एक कुटूंब 35 वृक्ष असे नियोजन करून दहा हजार वृक्ष लागवड केली आहे. या वृक्ष लागवडीची पाहणी आज पडत्या पावसात उपायुक्त विजय मुळीक यांनी केली.