सोलापूर : हॉटेल बालाजी सरोवरमध्ये १५ ते २४ जुलैदरम्यान तेलंगणा फूड फेस्टिव्हलचे (तेलंगणा रुचुलू) आयोजन करण्यात आले आहे. दररोज डिनर तसेच रविवारी लंच व डिनरची सोय आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध शेफ मल्लेश हे फूड फेस्टिव्हलचे सारथ्य करणार आहेत.
खास सोलापुरातील मांसाहारी खवय्यांसाठी स्पेशल डिशेस, चुक्काकुरा मटन, गोंगुरा मटन, नादु कोडी, चापाल पुलसु, तलकाई पुलसु, कलेयम फाय, कोडी एगुरू, पाया, तर शाकाहरी खवय्यांसाठी खमंग मेजवानी. मिरची भजी, पेसार वडा, दोंडकाई काजू फ्राय, पालकुरा पप्पू, बीरकाय अलचिंतलू, सोरकाय चटणी, वंकाया चटणी, ठक्कली मुनक्काया अशा विविध प्रकारच्या डिशेसचा समावेश आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालाजी सरोवर प्रीमियरचे व्यवस्थापक सुप्रभात रॉय चौधरी यांनी केले आहे.